IND vs NZ | टी-20 मालिकेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियात होऊ शकतो मोठा बदल, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा (Team India) 21 धावांनी पराभव झाला. तर आज दुपारी या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यात येणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघामध्ये काही बदल करू शकतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघातील फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाही. या सामन्यामध्ये वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी अर्धशतक केले. पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.

अशा परिस्थितीत टीम इंडियाला या मालिकेत टिकवून ठेवण्यासाठी कर्णधार हार्दिक पांड्या संघामध्ये महत्त्वाचे बदल करू शकतो. दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. जितेश शर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावा करत आहे. त्याचबरोबर तो अप्रतिम यष्टीरक्षण देखील करू शकतो. जितेश शर्माने मागच्या आयपीएल हंगामामध्ये पंजाब किंग्सकडून खेळत असताना चांगलेच मैदान गाजवले होते. त्याने तब्बल 12 सामने खेळले होते. यामध्ये त्याने 234 धावा केल्या होत्या.

त्याच्या या कामगिरीवर त्याला भारतीय टी-20 संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जितेश शर्माने 2013-14 विजय हजारे ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये लिस्ट A मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2015-16 मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला होता. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार आणि निवड समिती त्याला टी-20 सामन्यांमध्ये संधी देऊ शकते.

महत्वाच्या बातम्या