Rohit Sharma | BCCI ने रोहित शर्माला कर्णधार पदाबद्दल दिला मोठा दिलासा

Rohit Sharma | मुंबई: बीसीसीआय (BCCI) ने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात बीसीसी अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारतीय संघाच्या 2022 मधील कामगिरीवर चर्चा झाली. त्याचबरोबर नवीन वर्षांमधील सामने, वर्कलोड मॅनेजमेंट, आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित शर्माच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. या बैठकीनंतर रोहित शर्माच्या कर्णधार पदावरील धोका टळला आहे. बीसीसीआय रोहित शर्माच्या नेतृत्वावर नाखुश असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. हार्दिक पंड्या टी-20 सोबतच एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा भारतीय संघाचा कसोटी आणि वन डे कर्णधार असेल. बैठकीमध्ये रोहितला कर्मधारपदावरून काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, अशी देखील त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे.

दरम्यान, काल झालेल्या बैठकीनंतर रोहित शर्माला कर्णधार पदाबाबत दिलासा मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यामध्ये टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. तर एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्माकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय टी-20 संघामध्ये हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या