Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात बदल होईल, असा हवामान खात्याने अंदाज दिला होता. जानेवारीच्या सुरुवातीलाच गारठा वाढेल असे हवामान विभागाने सांगितले होते. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीला तापमानामध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. रविवारी 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 2.8 अंश सेल्सिअसने जास्त आहे. अशा परिस्थितीत राज्यात सकाळी थंडीचा कहर तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.
जानेवारी महिन्यामध्ये सर्वाधिक थंडी असते. या महिन्यांमध्ये किमान आणि कमान दोन्ही तापमानात सातत्याने बदल होतात. जानेवारीमध्ये दिवसा तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत असते, तर रात्री तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत असते. दरम्यान, अवकाळी पावसाची शक्यताही याच महिन्यामध्ये अधिक असते. मात्र यावर्षी जानेवारीत अवकाळी पाऊस न पडता थंडी पडेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
राज्यात पुण्यासह मुंबईमध्ये देखील थंडी वाढत चालली आहे. मुंबईमध्ये 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर रविवारी मुंबईत तापमान 15.6 अंश सेल्सिअस होते. राज्यामध्ये अनेक ठिकाणी 11 ते 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरली आहे. दरम्यान, येत्या तीन-चार दिवसांमध्ये हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर भागातील अनेक ठिकाणी पुढील दोन दिवस थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बेसनाचा वापर
- Rishabh Pant Accident | ऋषभ पंतच्या अपघातानंतर कपिल देव यांनी केलं मोठं व्यक्त, म्हणाले…
- Hair Care Tips | केसांना दाट आणि चमकदार बनवण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Nani 30 | ‘सीता रामम’नंतर ‘नानी 30’ मध्ये दिसणार मृणाल ठाकूर, पाहा फर्स्ट लूक
- Team India | वर्ल्ड कप शर्यतीमध्ये टीम इंडियात असतील ‘हे’ 20 खेळाडू