Ajit Pawar | “मास्टरमाईंड कोण हे समजलंच पाहिजे”; पत्रकाराच्या हत्येप्रकरणी अजित पवार सरकारवर आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुन आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार वारिशे हत्या प्रकरणी अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

“मास्टरमाईंड कोण हे समजलंच पाहिजे” (Ajit Pawar said One must understand who is the mastermind)

“कोकण विभागातील एक पत्रकारास ज्याप्रकारे संपवण्याचा आणि जो अपघात दाखवला गेला. यामागे कोण आहे, कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. हे सरकार, पोलीस यंत्रणा काय करत आहे? सगळे झोपा काढता आहेत काय? वस्तूस्थिती कळली पाहिजे. लोकांनाही कळेना, जर महत्तवाच्या लोकांच्याबाबत अशा घटना घडायला लागल्या, तर सर्वसामान्य माणासांनी कुणाकडे बघावं? कायदा, सुव्यवस्था कशी या राज्यात राहणार? या सगळ्याच गोष्टीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. याचा तपास लागलाच पाहिजे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार”- Ajit Pawar

“याबद्दल उद्या 27 तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत आणि हे सरकार आल्यापासून घडत आहेत, हे सरकारचं अपयश आहे” असंही अजित पवार म्हणाले आहेत.

विनायक राऊतांचा नारायण राणेंवर गंभीर आरोप

“पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरीच्या पैशांवर पोसणारा गुंड आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्यांचा कायमस्वरून बंदोबस्त करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. वारिशेंची हत्या घडवून आणली असून, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे,” असे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.

Vinayak Raut accuses Rane regarding journalist murder

“सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपचे जबाबदार केंद्रीय नेते यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका, प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. हा पंढरीनाथ गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीशेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं,” असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी नारायण राणेंवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-