BJP| पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची “ही” तीन नावं समोर

BJP| पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचं निधन झालं. गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये पुण्यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर झळकलेलं पाहायला मिळालं होत. तसचं गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (Loksabha election) चर्चा सुरू झाल्या असून भाजपकडून उमेदवाराच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. तर आता या जागेवर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आलेल पाहायला मिळत आहे.

तर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची चर्चा सुरू आहे. या तीन जणांपैकीच एकालाच तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही तीन नाव कोणाची आहेत याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट (swara bapat) तर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि माजी खासदार संजय काकडे ( Sanjay Kakade) यांच्या नावाची चर्चा होत आहे.

तसेच कसब्याच्या पराभवानंतर या पोटनिवडणुकीत भाजप सावधगिरी बाळगून उमेदवार उभा करणार हे मात्र स्पष्ट आहे. त्यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे. त्याबरोबरच मविआने देखील चाचपणी सुरू केली आहे. पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा मतदारसंघातुन निवडून आलेले मविआमधील कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तसेच निवडणूक आयोग लवकरच या निवडणुकीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-