Chitra Wagh | चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा फुलेंशी! चित्रा वाघ याचं वादग्रस्त वक्तव्य

Chitra Wagh | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षातील लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नव्या वक्तव्याने वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली आहे. त्या म्हणाल्या, “तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे.” पुण्यातील हेमंत रासने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?

“काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :