Sanjay Raut | “थोरातांनी बंडाची भूमिका घेतली पण…”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे राज्याच्या राजकारणात याची तुफान चर्चा रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

संजय राऊतांची प्रतिक्रिया (Sanjay Raut’s Reaction)

बाळासाहेब थोरात शांत आणि संयमी आहेत. चारित्र्य संपन्न नेते आहेत. त्यांनी बंडाची भूमिका घेतली म्हणजे नक्कीच ते मनातून दुखावले असणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

“थोरातांच्या नसानसात काँग्रेस” (Sanjay Raut talk about Thorat Family)  

“बाळासाहेब थोरातांनी भूमिका घेतलेली आहे. पण आम्ही जे काय बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबाला ओळखतो, त्यांच्या नसानसात काँग्रेस आहे. असं आम्ही अनेक वर्षांपासून पाहतो. हा त्यांचा राज्यातला पक्षांतर्गत मुद्दा किंवा वाद आहे आणि आम्ही भाष्य यासाठीच करतो, कारण शेवटी काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील एक घटक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षात सगळं स्थिरस्थावर असावं, ही आमची भूमिका आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“हायकमांड थोरातांकडे लक्ष देतील”

“दिल्लीतील त्यांचं हायकमांड यामध्ये लक्ष घालेल याची आम्हाला खात्री आहे. कारण, त्यांच्या अंतर्गत वादावर आम्ही बोलणं योग्य नाही. पण बाळासाहेब थोरात हे या अगोदर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. अत्यंत संयमी, स्वच्छ चारित्र्याचे, कर्तबगार असे ते नेते आहेत. थोरातांसारख्या नेत्याने अशी बंडाची भूमिका घ्यावी, म्हणजे नक्कीच ते मनातून दुखावलेले दिसत आहेत, अस्वस्थ आहेत. म्हणून त्यांच्या भूमिका त्यांचा पक्ष जाणून घेईन, असंच मी सांगू शकतो या पलिकडे मी बोलू शकत नाही” असे संजय राऊतांनी सांगितले आहे.

बाळासाहेब थोरांतांचा राजीनामा (Balasaheb Thorat Resigns)

नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींमुळे आपली अवहेलना झाल्याचा ठपका ठेवत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा सादर केल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब थोरात यांनी घेतेलेल्या या तडकाफडकीच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. थोरात यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या. आता दिल्ली हायकमांड थोरात प्रकरणात लक्ष घालणार का? काँग्रेसची यापुढील काय भूमिका असेल? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-