InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मराठवाडा

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेले शेतकरी ऐन पावसाळ्यातही आत्महत्या करत आहेत. गेल्या १४ दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र मराठवाड्यात थांबण्यास तयार नाही. १६ ते ३० जून या कालावधीत मराठवाड्यातील ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक नऊ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून त्या खालोखाल औरंगाबाद सात, नांदेड सहा आणि जालना जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. परभणी, लातूर व…
Read More...

वरुणराजाचा आठवडाभर राहणार महाराष्ट्रात मुक्काम

मुंबई - मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा महाराष्ट्रात आठवडाभर प्रभाव राहणार आहे. दरम्यान, कोकण, विदर्भ, मराठवाडा याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातही दमदार पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात असलेला कमी दाबाचा पट्टा पुढच्या 48 तासांत तीव्र होऊन यामुळे मध्य भारतात प्रभाव जाणवणार आहे. विदर्भात सोमवारी आणि मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तेथे मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस होईल. बुधवारीही विदर्भात सर्वदूर सरी बरसणार आहेत. कोकणात…
Read More...

बोगस जनावरे दाखवून चारा छावण्यांमध्ये होतोय घोटाळा- अशोक चव्हाण

राज्यातील काही भागातील विशेषत मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाचे चटके शेतकरी व सर्वसामान्य जनता सोसत असताना सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून चारा छावण्यांमध्ये बोगस जनावरे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. चारा छावण्यांमधील या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी अशी मागणी त्यांनी केली. मराठवाडय़ात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांंनी स्वत:च्या स्वयंसेवी संस्था दाखवून मोठय़ा प्रमाणावर चारा छावण्या सुरु केल्या आहेत. मात्र त्यात…
Read More...

विजयाची धुंद; दुष्काळाकडे दुर्लक्ष

राज्यात भीषण दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना मंत्री दुष्काळी पर्यटनात मग्न असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. दुष्काळाच्या पाहणीसाठी विदर्भात आलेले शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ तीव्र आहे. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुठे चारा छावणींना अनुदान नाही तर कुठे जनावरांसाठी चारा, पाणी उपलब्ध नाही. लोकसभा विजयाच्या धुंदीत राज्यकर्त्यांना दुष्काळग्रस्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही.…
Read More...

राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता, काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 17 : राज्यामध्ये बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल. अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव,…
Read More...

वाळून गेलेल्या कापसाला पाहून आदित्य म्हणाले, कापूस सुकून गेलाय; शेतकरीही अवाक्

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तेथील दुष्काळी परिस्थितीचा आढाव घेत असून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. नांदेड पासून आदित्य ठाकरे यांनी दौरा सुरु केला असून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील साळवा या गावाला भेट दिली. त्या गावात जाऊन आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या संवाद दरम्यान आदित्य ठाकरे वाळून गेलेल्या कापसाला पाहून कापूस सुकून गेलाय असे म्हणाले. त्यांच्या या विधानावर शेतकरी अवाक् झाले अन हसले..! आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यात दुष्काळग्रस्त…
Read More...

मराठवाड्यातील युवक हा सामाजिक व राजकिय व्यासपीठांवर सर्वात जास्त सक्रिय

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाथरी प्रिमियर लीगला रोहित पवार उपस्थित होते. आ. बाबाजानी दुर्रानी यांच्या मार्गदर्शनाखाली व जुनैद भैय्या दुर्रानी यांच्या नेतृत्वाखाली पाथरी प्रिमियर लीग आयोजित केली होती. पाथरी प्रिमियर लीग ही सर्वात मोठ्ठी क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेचं आयोजन करून युवकांना व्यासपीठ देण्याचं काम जुनैद भैय्या दुर्रानी यांनी केलं असल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. रोहित पवार यांनी मराठवाड्यातील शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. या…
Read More...

मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा – धनंजय मुंडे

मुंबई: मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्याकडे केली आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अगोदरच वेळेत न मिळालेले करंज आणि अन्य कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या…
Read More...

मराठवाड्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री

मागील चार वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार,मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजीवनी योजना, नागपूर मुंबईसमृद्धी महामार्ग, ऑरिक सिटी, मराठवाडा वॉटर ग्रीड अशा अनेक उपक्रमांच्यामाध्यमातून शासनाने मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचालसुरू केलेली आहे. मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यासाठी जलयुक्तशिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड मोहीम येथे प्रभावीपणे राबविली. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन जाण्यासाठीसर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील,अशी ग्वाही…
Read More...

मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन….

मराठवाड्यातील नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांत काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवरचे मोठे संकट टळले आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आता पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून आता पिकाची मदार परतीच्या पावसावर अवलंबून आहे.
Read More...