Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची सहमती नव्हती; पवारांच्या आत्मकथेतून मोठा खुलासा

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सोहळा पार पडला. या पुस्तकामध्ये शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबत या पुस्तकात नमूद केले आहे.

अजित पवारांच्या शपथविधीबाबत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात वेगाने हालचाली घडत होत्या. 23 नोव्हेंबरच्या सकाळी 6.30 वाजता माझा फोन वाजला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोहोचलेले असून अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचा पत्र सादर केला आहे, अशी माहिती मला त्या फोनद्वारे मिळाली. त्याचबरोबर अजितदादा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, असे देखील त्या फोनच्या माध्यमातून सांगण्यात आले. तो एक मोठा धक्का होता.” पहाटेच्या शपथविधी माझ्या परवानगीशिवाय झाला असल्याचा उल्लेख पवारांच्या पुस्तकात करण्यात आला आहे.

“अजित पवारांच्या शपथविधीबाबत समजल्यानंतर मी सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्याबद्दल थोडी माहिती मिळवल्यानंतर लक्षात आलं की जेमतेम आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे माझ्या संमतीने घडत असल्याची समजूत अजितची करून देण्यात आली होती. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की घडलेला हा सर्व प्रकार दिशाभूल करून घडवण्यात आला आहे.” अजितने उचललेलं पाऊल अत्यंत चुकीचं होतं त्याला राष्ट्रवादीचा अजिबात पाठिंबा नव्हता, असं शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेत म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं आहे. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, “तुम्ही सगळे गैरसमज करून घेत आहात. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे ते पक्षात नाही असं नाही. साहेब निवृत्त जरी होत असले तरी ते पक्षासाठी कायम हजर राहणार. साहेबांच्या वयाचा विचार करत आपणही जबाबदारी दुसरे नेतृत्वाकडे देत आहोत. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहे.”

महत्वाच्या बातम्या