Shivsena | मोठी घडामोड: संसदेतील शिवसेना कार्यालयही एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

Shivsena | नवी दिल्ली : शिवसेनेचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकणं किती अवैध आहे, हे पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरु आहे. असे असतानाच राजकीय वर्तुळात मोठी घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे.

Parliament Shivsena office has also been taken over by Eknath

संसदेतील शिवसेना कार्यालयावरही एकनाथ शिंदे गटाने ताब्यात घेतलं आहे. काल महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ताबा मिळवला आहे. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील हे कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत आहे. वादादरम्यान देखील दोन्ही गट या एकाच पक्ष कार्यालयात बसत होते. पण आता ही मालकी पूर्णपण लोकसभा सचिवालयाने (Loksabha) शिवसेना शिंदे गटाला दिली आहे.

Rahul Shewale Wrote Letter to the Central Secretariat

भारतीय संसदेतील शिवसेना पक्षाचं कार्यालय आता एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आलं आहे. खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे गटनेते आहेत. ‘निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्वाळा केल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयावर एकनाथ शिंदे गटाचा ताबा मिळावा’, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सचिवालयाला दिलेल्या पत्रामधून करण्यात आली होती. या पत्रानुसार आता राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने आज संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी ताबा घेतला आहे

दरम्यान, आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतची मागणी ठाकरे गटाने केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आता आमदारांच्या अपात्रतेबाबात आजापासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-