Team India | वर्ल्ड कप शर्यतीमध्ये टीम इंडियात असतील ‘हे’ 20 खेळाडू

Team India | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला (Team India) अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक ठेवली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड कप (World Cup) जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यामध्ये बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी पहिली पसंती म्हणून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापनावर संयुक्तपणे देखरेख करण्यात येणार आहे.

मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात बीसीसी अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली. यामध्ये एक दिवसीय विश्वचषक 2023 हा सर्वात महत्त्वाचा विषय होता. 2023 विश्वचषकासाठी बीसीसीआयने 20 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पुढील 35 एक दिवसीय सामन्यांमध्ये हे 20 खेळाडू फिरत राहतील.

बीसीसीआयने अद्याप या खेळाडूंची नावे घोषित केली नाही. मात्र, क्रिकेट तज्ञ या 20 खेळाडूंची नावे देत आहे. क्रिकेट तज्ञ हर्षा भोगले यांनी ट्विटरवर त्यांच्या पसंतीची नावं शेअर केली आहे.

बीसीसीआयने या खेळाडूंची नावे जाहीर केली नसली, तरी सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी या यादीमध्ये त्यांच्या आवडीच्या खेळाडूंचा उल्लेख केला आहे. यावर्षी एकदिवशी विश्वचषक भारतामध्ये पार पडणार आहे. चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत आहे.

या 20 खेळाडूंच्या यादीमध्ये तज्ञांपासून चाहत्यांपर्यंत सगळे आपल्या आवडीचे नावं देत आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, इशान किसन, या नावाचा वारंवार समावेश होत आहे. भारतीय संघ अनेक दिवसांपासून एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीची वाट बघत आहे. भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये शेवटचा विश्वचषक जिंकला होता.

महत्वाच्या बातम्या