Congress | “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत”; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराची खोचक टीका

Congress | सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. सोलापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी सध्या पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे.

प्रणिती शिंदेंची जहरी टीका (Praniti Shinde criticized Rohit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील ही मागणी केली आहे. प्रणिती शिंदे यांना राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी रोखठोक उत्तर देत कोण रोहित पवार? असा सवाल माध्यमांसमोर केला आहे. “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत. त्यांची पहिली टर्म आहे. त्यांच्यात अजून पोरकटपणा आहे. त्यांना थोडा वेळ द्या मॅच्युरिटी येईल”, असे वक्तव्य करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी खोचक टीका केली आहे.

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमदार प्राणिती शिंदे यांनी निषेध केला. तसंच महिला आमदारच सुरक्षित असतील तर ,सर्वसामान्य महिला सुरक्षा कशी होणार, असा सवालही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

दरम्यान, सध्या उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे भाजपवर निशाणा साधत आहेत. यावर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, “अदानी यांची चौकशी व्हावी. लोकसभेत मोदी कधी चिडले नव्हते, पण राहुल गांधींच्या अदानींवरील भाषणावर मोदी चिडल्यासारखे दिसत आहेत. यातूनच चित्र स्पष्ट होत आहे.”

महत्वाच्या बातम्या :