Sanjay Shirsat | मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बरोबर सरकार स्थापन केलं होतं’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केल्याने राज्यात मोठा राजकीय वाद उभा राहिला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिरसाटांनी सांगितलं बंद दारामागचं सत्य
“सत्तांतरावेळी ‘मातोश्री’त बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदेवर जुळवाजुळव करण्याची जबाबरदारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. तेव्हा संजय राऊत हे वेगळ्या हालचाली करत होते. आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये होतो. सकाळी उठून पाहतो, तर शपथविधी सुरु होता. त्यावेळी संजय राऊत आणि शरद पवार आपल्या कामात व्यस्त होते. ते कुठेही समोर आले नाहीत”, असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
“उद्धव ठाकरेंना इच्छा नसताना मुख्यमंत्री व्हावं लागलं”
“आताजर हे थांबवायचं असेल तर, एकनाथ शिंदेंच्या ऐवजी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी समोर आली आणि मोठा गेम झाला. उद्धव ठाकरेंना इच्छा नसताना मुख्यमंत्री व्हावं लागलं. हे सर्व घडवण्यात संजय राऊतांना हात होता,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं आहे.
“हे सर्व घडवून आणण्यात संजय राऊत एक प्यादे”
“एकदा शरद पवार बोलले होते, शिवसेना प्रमुखांच्या हयातील मला जमलं नाही, ते मी आता केलं. याचा अर्थ गांभीर्याने घेतला पाहिजे. हे सर्व घडवून आणण्यात संजय राऊत एक प्यादे होते. संजय राऊतांना शपथविधीचं सर्व माहिती होतं. म्हणूनच संजय राऊत त्यावर काही बोलत नाहीत. अजित पवार बोलले तर बॉम्बस्फोट होईल,” असा दावाही संजय शिरसाटांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sharad Pawar | “फडणवीसांचं महत्व वाढवावं असं मला वाटत नाही”; शरद पवारांची जहरी टीका
- Sharad Pawar | पवार इज पॉवर: सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेनंतर अब्दुल सत्तार सायलेंट मोडवर
- Chandrashekhar Bawankule | “अजित पवारांना 440चा करंट लागला पाहीजे”; बावनकुळेंचं आवाहन
- Mahashivratri Diet | शरीरात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महाशिवरात्रीच्या उपवासात करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला येणार 13 वा हप्ता