Sheetal Mhatre | “ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंनीच दिलाय, हे तरी…”; म्हात्रेंचं खोचक ट्वीट

Sheetal Mhatre | मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनेकदा माध्यमांसमोर येऊन संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.

Uddhav Thackeray Press Conference

“कागदोपत्री धनुष्यबाण चिन्ह आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरीही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे. मी माझ्या देव्हाऱ्यात पूजला जाणारा धनुष्यबाण दाखवतो”, असं म्हणत उद्धव ठाकरे धनुष्यबाण घेऊन पत्रकार परिषद घेत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.

“ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंनीच दिलाय”- Sheetal Mhatre

उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी खोचक टीका केली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता… हे तरी लक्षात आहे का? असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.

शीतल म्हात्रेंचं खोचक ट्वीट (Sheetal Mhatre’s Twit)

Uddhav Thackeray Statement After the decision of the Election commission 

“देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु आहे. मात्र पंतप्रधानांनी ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपवून आता देशात बेबंदशाहीला सुरुवात होत आहे, अशी घोषणा करायला हरकत नाही. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण दिला तरी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी देव्हाऱ्यात पूजलेला धनुष्यबाण मी तुम्हाला दाखवतो”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हा धनुष्यबाण दाखवला होता.

“या धनुष्यबाणावर कुंकूदेखील आहे. शिवसेना प्रमुखांच्या पूजेतला आणि अजूनही आमच्या देव्हाऱ्यात असलेला धनुष्यबाण असा कुणी हिरावून घेऊ शकत नाही. ते कुणीही ओरबाडून घेऊ शकत नाही. बाळासाहेबांनी त्यांच्या हातांनी पूजलेला धनुष्यबाण त्याचं तेज या शक्तीला दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-