Uddhav Thackeray | “नारायण राणेंना लवकरच मोदींच्या मंत्रिमंडळातून…”; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा काय?

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट व राणे कुटुंबीयांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा केला आहे.

देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ आणि सी-वोटर’चा सर्वे समोर आला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अशात केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणें वर टीकास्त्र सोडले आहे.

ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंच्या खात्याला मोठा निधी दिला. परंतु लुबाडणूक, फसवणूक शिवाय काहीच झालेले नाही. त्याचबरोबर केंद्रात अत्यंत​ खराब काम करणारे मंत्री म्हणून नारायण राणेंची चर्चा सुरू आहे, मी त्यांच्या वाईटावर नाही केवळ दिल्लीतील चर्चा सांगत आहे.”

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक हल्लाबोल सुरु आहे. यावर ते म्हणाले, “उद्धव ठाकरे दोघांशी चर्चा करतील. मात्र, दोन्हीकडून संयम ठेवण्याची आवश्यकता आहे.”

महत्वाच्या बातम्या :