InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे दौऱ्यावर असताना  दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले होते. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.धनंजय मुंडेंनी म्हंटले कि, मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा…
Read More...

सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून निषेध

परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, रबीचा हंगाम वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारा भाजीपाला पिकविला़ मात्र भाजीपाल्यालाही भाव मिळत नाही़ टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ या शिवाय जिल्ह्यात दुष्काळी योजनांना सुरुवात झाली नाही़ या कारणांवरून कृषी राज्यमंत्री आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलालगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनासमोर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त  केला़.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत…
Read More...

धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला अटक, मुख्यमंत्री आहेत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील आणि धर्मा पाटील यांच्या पत्नी आंदोलन करू शकता अशी माहिती सुरक्षा यंत्रणाना मिळाली होती. याची खबरदारी म्हणून धर्मा पाटील यांच्या मुलाला आणि धर्मा पाटील यांच्या पत्नीला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितले.कोण आहेत धर्मा पाटीलधर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे…
Read More...

बारामतीचे नेते आता पोपटासारखे बोलताहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावर बारामतीचे नेते आता पोपटासारखे बोलू लागले आहे. मी विरोधी बाकावर होतो तेव्हा बारामतीत धनगर समाजाचे लोक आंदोलन करत होती, त्यावेळी गोपीनाथ मुंढे यांनी मला पाठवले आणि भाजप सरकार आल्यास आरक्षणाची शिफारस केंद्राकडे तत्काळ करू, असे ग्वाही द्यायला सांगितली होती. यावेळी बारामतीच्या आंदोलनाकडे बारामतीचे नेते मात्र फिरकले नव्हते. आता ते पोपटासारखे बोलताहेत. आपण जे करू शकलो नाही, ते हे कसे करताहेत, याचा त्यांना त्रास होतोय अशी टीका त्यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर केली.…
Read More...

शिवसैनिक ‘कांदा… कांदा…’ ओरडत होते, मात्र उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दाच रेटला!

पंढरपूर | शिवसेना पक्षप्रमुख आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी जाहीर सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे.दरम्यान पंढरपुरातील त्यांच्या भाषणादरम्यान अजब प्रकार घडला. ठाकरेंचं भाषण ऐन रंगात आलं असताना खालून शिवसैनिक “कांदा… कांदा…” ओरडत होते, मात्र उद्धव ठाकरेंनी थोडावेळ भाषण थांबवलं आणि राम मंदिराचा मुद्दाच पुढे रेटला.उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांपेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत आहे का? असा प्रश्न शिवसैनिकांना निर्माण झाला. .यावेळी त्यांनी…
Read More...

हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही; गडकरींचं वादग्रस्त विधान

एक वेळ हिजड्याला मुलं होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र भाजपा सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असे वादग्रस्त विधान नितीन गडकरींनी सांगलीतील एका कार्यक्रमात केले.शेतकरी मेळाव्यात सिंचनावर बोलतांना गडकरींची जीभ पुन्हा घसरली.  'टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपा…
Read More...

आधुनिक आणि प्रयोगशील प्रशिक्षणामुळे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून यामुळे शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी कुशल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी आधारित कौशल्य विकासाचे…
Read More...

हवेतील कार्बन डाय ऑक्साईडमुळे वातावरणात बदल – रामदास कदम

हवेत कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने वातावरणात बदल होत असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. तसेच प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच 35 लाख कापडी पिशव्या बाजारात येतील. त्याचबरोबर 25 नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.कदम म्हणाले, हवामान बदलामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. भूकंप, महापूर, त्सुनामी, ओला-सुका दुष्काळ, तीव्र उष्णतेचा उन्हाळा, प्रचंड थंडीचा हिवाळा, नापिकी…
Read More...

धक्कादायक, परभणीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

पाथरी येथे नवीन कर्जाच्या मागणीसाठी स्टेट बॅंकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनात तुकाराम वैजनाथ काळे या शेतकऱ्याला उपोषणस्थळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ मानवत येथे रुग्णालयात नेण्यात येत होते. यावेळी प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला. सरकारकडून भरीव मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचे नैराश्य निर्माण झाले आहे. कर्जमाफी, दीडपट हमीभाव आणि जलयुक्त शिवार सारख्या घोषणांचे सरकार ढोल बडवत असले तरी या घोषणा फसव्या ठरल्या आहेत. या घोषणा दिलासादायक ठरल्या असत्या तर शेतकरी आत्महत्येचे…
Read More...

बेकादेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – दीपक केसरकर

वाळू उत्खनन बंदी काळात बेकादेशीररित्या,अनियमित, प्रमाणापेक्षा अधिक वाळू उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे गृह राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.वाळू उपशासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.केसरकर बोलत होते. मेरीटाईम बोर्डाने गेल्या वर्षी ज्या अनियमितता झाल्या आहेत, ते सर्व क्रमांक वगळून उर्वरित सर्वेक्षणाचा अहवाल आठ दिवसांच्या आत सादर करावा. हातपाटी स्ट्रोक, डुबी या पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्यांचा दर काय असावा, या संदर्भात शासन लवकरच निर्णय…
Read More...