Aditya Thackeray | “ओरिजनल गद्दारांना मंत्रिपदं मिळणार…”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Aditya Thackeray | मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि काँग्रेसकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला. ओरिजनल गद्दारांना मंत्रिपद मिळणार नाही, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य […]

Nana Patole | “उधारीचा शेंदूर हे सरकार एकमेकांना…”; नाना पटोले यांचा राज्य सरकारवर घणाघात

Nana Patole | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरु झाल आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून तीव्र आंदोलन केलं. त्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]

Monsoon Session | सासुमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Monsoon Session | मुंबई: आजपासून विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं आहे. Damn the unconstitutional and tainted government […]

Monsoon Session | शेतकरी संकटात असताना काही टोळ्या हप्ते वसूल करतायं – बाळासाहेब थोरात

Monsoon Session | मुंबई: आजपासून (17 जुलै) राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतरच हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. Still 50 percent of the state has not received rain […]

Bacchu Kadu | “बच्चू कडूंना मंत्रिपद…”; मुख्यमंत्री शिंदेंना कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र

Bacchu Kadu | सोलापूर: अजित पवार आणि त्यांचे सहकारी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री पदावर यापुढे दावा करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. आज (17 जुलै) बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात पुन्हा येणार मोठा भूकंप? अजित पवारांनी मारला डोळा

Ajit Pawar | नाशिक: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमापूर्वी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा डोळा मारला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना […]

Eknath Shinde | कलंक नाही तर निष्कलंक म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव अभिमानानं घेतलं पाहिजे – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | नाशिक: नाशिक शहरामध्ये आज शासन आपल्यादारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तोंड भरून कौतुक केलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. […]

Devendra Fadnavis | विरोधकांच्या पोटदुखीवर औषध देण्यासाठी डॉ. एकनाथ शिंदेंना आणलायं – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | नाशिक: आज नाशिक शहरामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस उपस्थित आहे. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकावून टीका केली आहे. विरोधकांची पोट दुखी कमी करण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिंदे यांना आणलं आहे, असं देवेंद्र फडणवीस […]

Eknath Shinde | घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवते; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde | नाशिक: आज (15 जुलै) नाशिक शहरामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केलं आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्हाला मोडीत काढायची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे. […]

Nikhil Wagle | शिंदे-फडणवीस युती मोडीत काढायची सुपारी तर दादांनी घेतली नाही ना? – निखिल वागळे

Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. काल (14 जुलै) अजित पवार आणि त्यांच्यासह शपत घेतलेल्या आमदारांना खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये शिंदे गटाची (Eknath Shinde) इच्छा नसताना अजित पवारांना अर्थ खात देण्यात आलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. […]

Sanjay Raut | शिंदे गटाला अजितदादांची धुणीभांडी करावी लागणार – संजय राऊत

Sanjay Raut | नाशिक: काल (14 जुलै) अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेत्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. सध्या शिंदे गटातील लोक आनंदानं टाळ्या वाजवत आहे. मात्र, त्यांना अजित पवारांची धुणीभांडी करावी लागणार आहे, असं […]

Ajit Pawar | मी जाहिरातबाजी करणारा नेता नाही; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

Ajit Pawar | नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं  आणि जाहिरातबाजीचं नातं सर्वांनाच माहित आहे. जाहिरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं होतं. याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. I am not an ad or a show […]

Aditya Thackeray | ना खाती, ना इज्जत, गद्दारांना काय मिळालं? शिंदे गटावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह शपथ घेतलेल्या आमदारांना काल (15 जुलै) खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खात तर धनंजय मुंडेंना कृषी खात मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. ओरिजनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलं आहे का? असा सवाल देखील आदित्य ठाकरे […]

Ajit Pawar | नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला देशात कुठेच पाहायला मिळणार नाही – अजित पवार

Ajit Pawar | नाशिक: अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरामध्ये आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतामध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखं नेतृत्व कुठंच पाहायला मिळणार नाही, असं वक्तव्य […]

Sanjay Raut | लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी माणसं जबरदस्तीनं आणली जातात; संजय राऊतांची राज्य सरकारवर खोचक टीका

Sanjay Raut | मुंबई: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिक शहरामध्ये दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी जबरदस्तीनं माणसं आणली […]