InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

महाराष्ट्र

एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी खासदार इम्तियाज जलील यांची निवड

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन (एआयएमआयएम) या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जलील यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने टाकली आहे. इम्तियाज जलील हे एमआयएम या पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एमआयएम पक्षाने ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह आघाडी तयार करून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली निवडणुका लढवल्या. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वंचित…
Read More...

मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतली शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट .

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीबाबतच्या विविध मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी बैठकांचे सत्र लावले आहे. आज त्यांनी खरगे…
Read More...

‘बीफ बंदी’ चा फैसला आता सर्वोच्च न्यायालयात

महाराष्ट्र सरकारने गायी आणि बैलांच्या कत्तलीवर बंदी घालणारा निर्णय दिला होता. या बीफ बॅनच्या निर्णयावरून बराच वादंग माजला होता. मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय कायम ठेवला होता. पण गाय आणि बैलांची कत्तल जर महाराष्ट्राच्या बाहेर झाली असेल तर मात्र बीफचा साठा करणं हा गुन्हा नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं होतं. हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. पण या याचिकांवरच्या सुनावणीचा निर्णय देण्यातून इंदू मल्होत्रा यांनी अंग काढून घेतलं…
Read More...

कृषी क्षेत्राची पिछेहाट तरीही ०.४ टक्के वाढ अपेक्षित

दुष्काळामुळे राज्याचा कृषी विकास दर ०.८ टक्क्यांवरून तब्बल उणे आठ टक्क्यांवर घसरला असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. एकाबाजूला कृषी क्षेत्राची पिछेहाट होत असताना दुसऱ्या बाजूला कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात ०.४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीही साडेसात टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
Read More...

गुजरातमध्ये हाय अलर्ट; शाळा- महाविद्यालये बंद

वायू’ चक्रीवादळ 13 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश शहा यांनी दिले. तसेच यादरम्यान वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, शाह यांनी आपात्कालिन नियंत्रण कक्षाला 24 तास अलर्ट…
Read More...

पावसाळ्यात अपघातग्रस्तांच्या संख्येत वाढ

पावसाळ्यात अपघातग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रस्ते अपघातात सुमारे ३७ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस दलातील सूत्रांनी दिली.  राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार अपघात होत असल्याची माहिती समोर येत आहे. अपघात अन् ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हा स्तरावर खासदार, पालकमंत्री, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामार्ग या अधिकाऱ्यांची…
Read More...

आत्मचिंतनासाठी आता हिमालयात जावं, शिवसेनेचा विरोधकांना सल्ला

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मोठा पराभव स्विकारावा लागला. राज्यात देखील भाजप-सेना युतीचा 41 जागांवर विजय झाला तर आघाडीला केवळ 5 जागांवर विजय मिळाला. विरोधकांच्या या पराभवानंतर शिवसेनेने विरोधकांना आत्मचिंतनासाठी हिमालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसासाठी केदारनाथ येथे गेले तेव्हा त्यांची खिल्ली विरोधकांनी उडवली आता विरोधकांना अंगावर राख फासून हिमालयात जाण्याची वेळ आली आहे असाही खोचक टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून  लगावण्यात आला…
Read More...

…अशी आहे लोकसभा निवडणुकीची 12 वाजेपर्यंतची राज्यातील सर्व जागांची आकडेवारी

लोकसभा निवडणुकीच्या 12 वाजेपर्यंतचे आकडे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये 4 उमेदवारांनी लाखापेक्षा अधिकची आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे हे 4 ही उमेदवार युतीचे आहेत. या आकडेवारीनुसार उन्मेष पाटील,  श्रीरंग बारणे, मनोज कोटक आणि रक्षा खडसे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल :- अमरावती - अनंतराव अडसूळ ५ हजार मतांची आघाडी बारामती - सुप्रिया सुळे ६९ हजार मतांची आघाडी बीड - प्रीतम मुंडे ५४ हजार मतांची आघाडी अहमदनगर - सुजय विखे ९७ हजार मतांची आघाडी अकोला - संजय…
Read More...

सुरक्षेच्या कारणावरुन मुंबईच्या डबेवाल्यांना शाळांमध्ये प्रवेशबंदी

मुंबईतील शाळांमध्ये डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुट्टीत डबे आणण्यास मनाई करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले असल्याचे शाळांकडून कारण सांगण्यात येत आहे. ही बंदी अयोग्य असल्याचे मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले असून, मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही तातडीने लक्ष घालण्यााचे निर्देश शिक्षण उपसंचालकांना दिले आहे. आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज…
Read More...

ज्योतिष संमेलनातील वर्तवण्यात आले भाकीत, विधानसभेत मनसे जिंकणार दोन आकडी जागा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष मनसे, दोन आकडी जागा जिंकेल, असे भाकित नाशिकच्या ज्योतिष संमेलनात वर्तवण्यात आले आहे. नाशिकमध्ये सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर शात्री यांनी हे भाकित केले आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीकरून निवडणूक लढवणार असेही, त्यांनी सांगितले. राज यांच्या पत्रिकेतील गुरु पुन्हा धनु राशीत येत असल्याने याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत…
Read More...