InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Agriculture

चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय

राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृहे सुरू करण्याचे निर्देश देखील श्री. पाटील यांनी यावेळी दिले.मंत्रालयात दुष्काळावरील उपाय योजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक…
Read More...

दूध संघांनी दूध पिशव्यांच्या संकलन, पुनर्प्रक्रिया व्यवस्थेचा आराखडा १५ दिवसांत सादर करण्याचे…

पंधरा दिवसांच्या मुदतीमध्ये दूध संघांनी पिशवीबंद दूध पिशव्यांची संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) व्यवस्थेचा आराखडा सादर करावा. मुदतीत योग्य ती कार्यवाही करण्यास असमर्थ ठरणाऱ्या पॅकिंग दूध प्रकल्पांवर प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज येथे दिला.प्लास्टिकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक आज श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी कामगारमंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर, महाराष्ट्र…
Read More...

राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे साडेपंधरा हजार गावांना पाणी

राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून 4920 गावे व 10506 वाड्यांमध्ये 6209 टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात शेळ्या-मेंढ्यांसह मोठ्या व लहान जनावरांसाठी दीड हजार चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींच्या मदतीचे वाटप करण्यासह विद्युत शुल्कात सवलत, शैक्षणिक शुल्क माफी,…
Read More...

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँका, बोगस बियाणे उत्पादकांवर कठोर कारवाई – रामदास कदम

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर तसेच बोगस बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज येथे दिले.नांदेड जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व तयारी तसेच दुष्‍काळसदृश परिस्थिती आढावा बैठक श्री. कदम यांच्‍या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस नवनिर्वाचित खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री डी. पी. सावंत, सुभाष साबणे, राम पाटील रातोळीकर, श्रीमती अमिता चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण…
Read More...

मोठी बातमी- शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मान्सून अंदमानमध्ये दाखल

दुष्काळाच्या झळांनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २२ मे रोजी अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला मान्सून चार दिवस आधीच दाखल झाला आहे. स्कायमेट हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अंदमान निकोबार आणि दक्षिण बंगालचा उपसागर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे.मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील लवकर येण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत अंदमानात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दरम्यान, आयएमडीच्या…
Read More...

मंत्रिमंडळ निर्णय : दि.१७ मे २०१९

रोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणाररोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्याचा निर्णयही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.राज्यातील दुष्काळी…
Read More...

राज्यात गंभीर दुष्काळ, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील दुष्काळामुळे तयार झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात शरद पवार आज सायंकाळी 8 वाजता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. यावेळी ते दुष्काळग्रस्त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडतील.‘सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह…
Read More...

टँकरद्वारे नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या सूचना

मुंबई, दि. 14 : दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. तसेच दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी यावेळी…
Read More...

सरपंचांच्या मागणीची तात्काळ दखल घेत नदी-नाल्यातील गाळ काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 14 : गावात नदी, नाले व विहिरी आहेत, परंतु त्यामध्ये गाळ साचल्यामुळे पाणी साठा होत नसल्याच्या तक्रारी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सरपंचांनी करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या गावामध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून या जलस्त्रोताच्या ठिकाणचे गाळ काढणे व खोलीकरण करण्याचे निर्देश दिले. गाळ काढल्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटणार असल्याची प्रतिक्रियाही यावेळी या सरपंचांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील…
Read More...

नागरिकांशी संवाद साधून परिणामकारकपणे दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिज यंत्रणेद्वारे संवाद साधून दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हास्तरावरील…
Read More...