Sanjay Raut | पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

Sanjay Raut | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवेसनेच्या ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या … Read more

Nilesh Rane | “अशोक गेहलोत आणि उद्धव ठाकरे हे वेगळे नाहीत”; निलेश राणे असं का म्हणाले?

Nilesh Rane | मुंबई : राजस्थान सरकारसाठी लोकसभा सभागृहामध्ये आज अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक दिवस होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करताना मोठा घोळ घातला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केल्याने विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more

Nilesh Rane | “बदनामीचा दावा करायला मार्केटमध्ये काहीतरी इज्जत असावी लागते”;

Nilesh Rane | मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली आपणच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत … Read more

Nilesh Rane | अनिल परबांवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली; म्हणाले…

Nilesh Rane | मुंबई : शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचं म्हाडाच्या वांद्रे येथील वस्तीत असणारं कार्यालय काल पाडण्यात आलं. त्याववरुन राजकारण तापलं आहे. संबंधित कार्यालय हे अनधिकृतपणे बांधण्यात आलं होतं. त्यामुळे म्हाडाने त्यावर हातोडा मारत कारवाई केली, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र, या सगळ्या घडामोडी नंतर … Read more

Nilesh Rane | “पवार साहेब असे एकमेव व्यक्तिमत्व…”; भाजप नेत्याची पवारांवर बोचरी टीका

Nilesh Rane | मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका-टिपण्णी झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेच्या 40 आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी सेनेत बंडखोरी केली आणि सेनेचाच वेगळा गट तयार केला. याच पार्श्वभूमीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजपचे … Read more

BJP | जगाला खरं कळेल तेव्हा पवारसाहेब अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत; भाजप नेत्याचा विश्वास

BJP | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या झालेल्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. हा विषय  सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यावरुन आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी … Read more

Nilesh Rane | “आदित्य ठाकरेंनी मंत्री असताना दावोस दौऱ्यानंतर लंडनमध्ये…”; निलेश राणेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Nilesh Rane | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच भाजपा नेते निलेश … Read more

Nilesh Rane | आदित्य ठाकरेंना आजोबांच्या जयंतीचा विसर; निलेश राणे म्हणाले “गांजाप्रमुख…”

Nilesh Rane | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे कुटुंब आणि भाजपच्या राणे कुटुंबाचे वैर काही नवे नाही. ठाकरे आणि राणे कुटुंबात एकमेकांवर बोलण्याची एक संधी सोडत नाहीत. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी काल रविवारी केलेल्या एका ट्विटवरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. “युवासेना गांजाप्रमुखकडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, याला जयंती आणि … Read more