Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”

Nana Patole | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी आज दिली आहे. “महाराष्ट्रासारख्या संत, … Read more

Bhaskar Jadhav | “नारायण राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं…”, भास्कर जाधवांची टोलेबाजी 

Bhaskar Jadhav | मुंबई : आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषण केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं. मुळात शिवशक्ती उरलीच कुठे, असा सवाल नारायण राणे यांनी केला. त्यांच्या … Read more

Rahul Gandhi | लग्न करण्यासाठी राहुल गांधींनी ठेवली ‘ही’ अट; म्हणाले, “मुलगी…”

Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo News) माध्यमातून देशभरातील विविध भागांना भेटी देत आहेत. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या प्रवास आणि फूड चॅनल कर्लिटेल्ससोबतच्या मजेदार संभाषणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी त्यांचा डाएट, वर्कआउट, … Read more

Narayan Rane | “मोदींवर टीका करण्याची ‘या’ दोघांची लायकी नाही”; नारायण राणेंकडून सडेतोड प्रत्युत्तर  

Narayan Rane | मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही युतीचीा घोषणा करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही एक दिवस अंत होईल, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. यावरून नारायण राणे यांनी … Read more

Uddhav Thackeray | “गद्दारांना आणि त्यांच्या राजकीय बापांना…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई : मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.  शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे. ते … Read more

Chandrashekhar Bawankule | “जो नेता आपलं घरं आणि ४० आमदार सांभाळू शकत नाही तो युती काय टिकवणार? “

Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीबाबत भाकीत केलं आहे. ही युती झाली तरी ती खूप काळ टिकणार नाही, एक दिवस प्रकाश आंबेडकर कंटाळणार, … Read more

Prakash Ambedkar | युतीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नातेवाईकांचं राजकारण…”

Prakash Ambedkar | मुंबई :  उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राजकारणात कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आमच्या नेतृत्वाचा अंत … Read more

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची घोषणा; म्हणाले, “राजकारणातील वाईट…”

Uddhav Thackeray | मुंबई : अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “आज एका स्वप्नाची पूर्ती … Read more

Sanjay Raut | “‘त्या’ दोन विचारांची युती हे बाळासाहेब ठाकरे यांचं जूनं स्वप्न”; युतीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut | मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आज युती होत आहे. आज दुपारी या युतीची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या युतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या युतीवर … Read more

Uddhav Thackeray | “त्याच घाटावर या हराXXXX राजकीय चिता पेटेल आणि…”; बाळासाहेबांना अभिवादन करत ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काय म्हटलंय ‘सामना’त? सामनात म्हटलंय की, “शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे … Read more

Arvind Sawant | बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “शिवसेनेच्या पाठीत खंजीर…”

Arvind Sawant | मुंबई : आज 23 जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी देखील ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये … Read more

Raj Thackeray | “जा लढ, मी आहे…”; बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट!

Raj Thackeray | मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. मनसेने देखील आपल्या ट्विटर हँडलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. … Read more

Girish Mahajan | “माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा…” ; शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

Girish Mahajan | जळगाव: पुण्यामध्ये झालेल्या शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. “पुरस्कार सोहळ्यात बोलताना माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त … Read more

Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारने बेळगावत…” ; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

Sanjay Raut | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. दरम्यान, ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात जातील की काय अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे उत्तर … Read more