Girish mahajan | “राऊतांच्या तोंडाला लगाम नाही, एक जागा जिंकली म्हणजे मोठा तीर नाही मारला”

Girish Mahajan | मुंबई : दोन दिवसांपूर्वी कसबा निवडणूक पार पडली. या निवडणुकीची चर्चा दोन दिवसांनंतरही सुरूच आहे. अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार मतांनी विजयी मिळवला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यावर आपलं नाव कोरले आहे. या विजयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. … Read more

Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar | मुंबई : मुंबईमध्ये सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील निवडणुकींबाबत बोलताना विरोधकांवर तुफान टोलेबाजी केली आहे. Ajit Pawar Criticize on state government  “राज्यात ८ महिने झालं शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. पण कोणी काहीही म्हणो, सगळ्यात … Read more

Girish Mahajan | “मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा”; महाजनांनी सांगितलं ‘ते’ पेनड्राईव्ह प्रकरण

Girish Mahajan | जळगाव : विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांना मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात गुन्ह्या दाखल करुन शहर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना आज जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. या प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकारी वकील प्रवीण … Read more

Eknath Khadse | “…तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांना माझा पाठिंबा”; एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य 

Eknath Khadse | जळगाव : राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांमुळे तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आज अचानक एकनाथ खडसे यांनी … Read more

Girish Mahajan | “‘ही’ परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे”; महाजनांचं आश्विनी जगताप यांच्या भेटीनंतर वक्तव्य

Girish Mahajan | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातून भाजपकडून दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील सदस्यालाच उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना चिंचवड मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. तर कसबा मतदारसंघातून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जागी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष … Read more

Girish mahajan | “मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला”; राऊतांच्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : हिंदू समाजाच्या वतीने रविवारी मुंबईत ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात कायदे करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. … Read more

Girish Mahajan | “माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा…” ; शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

Girish Mahajan | जळगाव: पुण्यामध्ये झालेल्या शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. “पुरस्कार सोहळ्यात बोलताना माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त … Read more