InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

राहुल गांधी

राजीनाम्यानंतरही काँग्रेसमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतं आहेत राहुल गांधी?

काँग्रेसने नुकतीच महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली. तसेच 5 कार्यकारी अध्यक्षदेखील नेमले आहेत. महाराष्ट्राअगोदर छत्तीसगडमध्येदेखील नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. परंतु काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी 50 दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मग पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोण घेत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे कामकाज कसे सुरु आहे? पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोण घेत आहे? पक्षावर…
Read More...

उद्याच्या बैठकीत काँग्रेसचा उत्तराधिकारी निवडला जाण्याची शक्यता

राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षापदावरून राजीनामा दिल्यानंतर उद्याच्या बैठकीत त्यांचा उत्तराधिकारी निवडला जाण्याची शक्यता आहे. या पदावर मुकुल वासनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक असून त्यामध्ये कोण काँग्रेस अध्यक्ष करायचा यावर निर्णय होवू शकतो.लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेसला सर्वात गंभीर नेतृत्व संकटाचा सामना करावा लागला आहे. नेतृत्व संकटाच्या दरम्यान…
Read More...

‘काँग्रेस विसर्जित करण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न राहुल गांधी पूर्ण करणार’

लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएला मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले. तर दुसरीकडे ७० वर्ष सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाला घरी बसवले. यामागे मुख्य कारण म्हणजे, काँग्रेसला नेहरू गांधी परिवाराने स्वतःचा पक्ष म्हणून चालवले, परिवाराव्यतिरिक्त इतर कुठल्याही नेत्याला पक्षाची जबाबदारी सोपवणे या कुटुंबाला जमले नाही. असे मत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय संयोजक शिवराजसिंह चव्हाण यांनी आज नागपुरात व्यक्त केले.…
Read More...

‘श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकता, मग शेतकऱ्यांचे का नाही?’

भाजप लाखो कोटींचे श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकते मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करू शकत नाही? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारला आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या कृषीविषयक धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.'सरकारने गेल्या पाच वर्षांत श्रीमंतांचे ५.५ लाख कोटींचे कर्ज माफ केलं आहे. पण त्याचवेळी शेतकऱ्यांचे कर्ज मात्र सरकार माफ करत नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारने पूर्तता करायला हवी' असं राहुल गांधींनी सांगितलं. याआधीही भाजप सरकार शेतकरीविरोधी…
Read More...

‘टीम इंडिया, तुम्ही चांगला प्रयत्न केला’; राहुल गांधींची सेमीफायनल नंतर प्रतिक्रिया

आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही टीम इंडियासाठी ट्वीट केलं. “आजच्या रात्री करोडो भारतीयांची मनं दुखावल्या गेली असतील. मात्र, टीम इंडिया, तुम्ही चांगला प्रयत्न केला. तुम्हाला प्रेम आणि आदर मिळायला हवा”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं. त्यासोबतच राहुल गांधींनी न्यूझीलंडला त्यांच्या विजयाबाबत शुभेच्छाही दिल्या.'ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर काल (9 जुलै) न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा…
Read More...

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून बँकांनी त्रास देऊ नये, यावरदेखील सरकारने लक्ष द्यावे, असेही राहुल यावेळी म्हणाले. यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी…
Read More...

राहुल गांधींविरोधातील वक्तव्य सुब्रमण्यम स्वामींना पडले महागात

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणे भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी स्वामी यांच्याविरोधात राजस्थानात २० याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेनंतर यूथ काँग्रेसकडून विविध पोलीस स्टेशनमध्ये ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.राहुल गांधी हे अंमलीपदार्थाचे सेवन करतात असे वादग्रस्त विधान सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत…
Read More...

‘काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती स्थापन करा’

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करायची यावरून पक्षांतर्गत पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे.राहुल गांधी यांची भूमिका स्पष्ट झाल्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी सचिव जनार्दन द्विवेदी यांनी नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी. ही समिती एकत्र विचारविनिमय करून अध्यक्षाचे नाव निश्चित करेल, अशी सूचना केली आहे.…
Read More...

काँग्रेसच्या अध्यक्षांची नावं बंद लिफाफ्यात?

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा तरुण असावा असं अनेकांचं मत आहे तर अनेकजण ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यावर ठाम आहेत. अध्यक्षपदासाठी काही नावं पुढं येत असली तरी नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी बंद लिफाफ्यात नावं देण्याच्या सूचना महासचिवांना देण्यात आल्या आहेत.काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय अध्यक्षांना अध्यक्षपदासाठी चार-चार नावं बंद लिफाफ्यात द्यावीत अशा सूचना सर्व महासचिवांना दिल्या आहेत. महासचिवांकडून आलेल्या या…
Read More...

सोनिया गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे लोकसभेतली राहुल गांधींनी पहिली जागा गमावली

लोकसभेत विरोधकांच्या पहिल्या रांगेत आता राहुल गांधी दिसणार नाहीत. काँग्रेसने लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून अधीररंजन चौधरी  यांचं नाव पुढे केलं गेलं. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीच अधीररंजन चौधरींचं नाव सुचवलं होतं लोकलेखा समितीचा अध्यक्ष हे लोकसभेत मानाचं पद असतं. त्यांची जागासुद्धा पहिल्या रांगेत असते. त्यामुळे अधीररंजन यांना पहिल्या रांगेत जागा मिळेल. पण त्यामुळे राहुल गांधी यांना मात्र लोकसभेत पहिल्या रांगेतलं सीट मिळण्याची चिन्हं नाहीत.काँग्रेस संसदीय…
Read More...