InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्री कुमारस्वामी व काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

राज्यपाल वजुभाई वाला यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांत तीन डेडलाइन देऊनही कर्नाटकाच्या विश्वासमताचे घोंगडे सोमवारपर्यंत भिजत राहिले. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी रात्री विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यपालांना विधानसभाध्यक्षांना आदेश देण्याचा अधिकारच नाही, असा दावा करत मुख्यमंत्री कुमारस्वामी व काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी गुरुवारची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र,…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणीत वाढ

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजेरी लावण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालायने कुमारस्वामी यांच्या सरकारला जोरदार झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी म्हणजेच उद्या कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना यामध्ये सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय घेण्याची मुभा बंडखोर आमदारांना दिली आहे.राज्य विधानसभेच्या सदस्यत्वाचे दिलेले…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाचा आसाराम बापूला दणका

सूरत बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला जामीन देण्याची याचिका पुन्हा एकदा फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून हा निर्णय देण्य़ात आला आहे. सोबतच लवकरात लवकर या प्रकरणी सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देशही कनिष्ठ न्यायालयाला देण्यात आले आहेत.आसाराम बापूविरोधात सुरु असणाऱ्या खटल्य़ामध्ये अद्यापही १० साक्षीदारांची साक्ष घेतली नसल्याचं गुजरात सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील निर्णायक सुनावणी काय असणाऱ याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.महत्वाच्या…
Read More...

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान

राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. त्यानुसार मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नकार दिला आहे. मात्र, याप्रकरणी पुढील दोन आठवड्यात उत्तर देण्याचेही राज्य सरकारला बजावले आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच, हा निकाल म्हणजे पांडुरंगाने दिलेला आशीर्वादच असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणाविरोधात डॉ.…
Read More...

सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिराच्या मुद्यावर सुनावणी सुरू

अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. मार्च महिन्यामध्ये न्यायालयानं यावर सुनावणी करताना मध्यस्तीनं तोडगा काढावा असे आदेश दिले होते. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाकर्ते गोपाळ सिंह यांनी या प्रकरणात मध्यस्ती काम करत नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यावर निर्णय द्यावा अशी मागणी केली. त्यावर मध्यस्तीकरता वेळ दिला आहे. तो रिपोर्ट अद्याप आलेला नाही, असं उत्तर दिलं.मध्यस्थीकरता सर्वोच्च न्यायालयानं यामध्ये तीन सदस्यांना…
Read More...

उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेतल्या नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याऐवजी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार अनुक्रमे १३ आणि १२ टक्के आरक्षण देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.…
Read More...

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करा’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी आरोप अ‍ॅड. सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.२०१४ मध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील असून त्यातील एक…
Read More...

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण; मराठा आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पूर्वलक्ष्यी प्रभावाने मराठा समाजाला (एसईबीसी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यादरम्यान विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताच…
Read More...

अयोध्या प्रकरणाचा निकाल आणखी लांबणीवर

सर्वोच्च न्यायालयात आज अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीचा जागेशी संबंधित असलेल्या वादावरील सुनावणीचा निर्णय दिला आहे. मध्यस्थ कमिटीने बंद पाकिटातून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला असून, कमिटीने 15 ऑगस्टपर्यंत मुदत मागितली आहे. कमिटीच्या या मागणीला न्यायालयाकडून तात्काळ मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्या प्रकरणाचा हा निकाल आणखी लांबणीवर नेण्यात आला आहे.याप्रकरणी न्यायालयाने 3 सदस्यीय पॅनेलचीही स्थापना असून, या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलीफुल्ला यांच्यासह…
Read More...

ममता बॅनर्जी यांना झटका; राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर करा; न्यायालयाचे आदेश

शारदा चिटफंड घोटाळ्या प्रकरणी मोदी सरकार विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. कोलकाता शहर पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय समोर हजर होण्यात काय अडचण आहे असा सवाल करत न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना झटका दिला आहे.अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी डीजीपी, मुख्य सचिव आणि राजीव कुमार यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी राजीव कुमार यांनी असहकार्य करण्याचे काहीच कारण नसल्याचे…
Read More...