InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अजित पवार

सरकार तुमचं असताना कसले मोर्चे काढताय? – अजित पवार

‘शिवसेना रडीचा डाव खेळत आहे. सरकार तुमचं असताना कसले मोर्चे काढताय? अधिकाऱ्यांकडून पैसे काढा आणि शेतकऱ्यांना द्या. खरिपाचा पीक विमा असताना रब्बीचा पीकविमा काढणाऱ्या कंपनीवर यांनी मोर्चा काढला. आता काय कळतंय का यांना?’ असं म्हणत शेतकरी प्रश्नावरून अजित पवार यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, राज्यात नवे उद्योग स्थापण्यासाठी…
Read More...

‘सत्तेत आल्यास खासगी कारखान्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देईल’

आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास आमचे सरकार खासगी कारखान्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले. ते सोमवारी पैठण येते बोलत होते. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून पैठण येथून सुरुवात झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेला खासदार अमोल कोल्हे,…
Read More...

‘आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का?’

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचा समाचार घेताना, आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? आहेत. असा प्रश्न उपस्थित केला.…
Read More...

‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’; अजित पवारांची फडणवीसांवर टीका

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आज पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रसेचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. पूरस्थितीतही हे सरकार असंवेदनशील असून कसली टिंगलटवाळी चालली आहे, अशा शब्दात…
Read More...

- Advertisement -

‘बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात घ्यावं लागतं’; अजित पवारांची सरकारवर टीका

शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात घ्यावं लागतं, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘राष्ट्रवादीने पूरग्रस्त भागात मदत ओतली मात्र कसलेही फोटो काढले नाहीत. मात्र भाजपच्या मंत्र्यांना…
Read More...

अजित पवारांची ‘या’ निवडणुकीतून माघार

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना  कळवले आहे. भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम  जाहीर झाला असून प्रशासकांनी   १७ ऑगस्टपर्यंत प्रत्येक संघटनेकडून दोन नावे…
Read More...

अजित पवार यांच्या फार्महाऊसला लागली मोठी आग

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या मुळशी येथील फार्महाऊसला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. घोटवडे फाट्यापासून काही अंतरावर मुळा नदीच्या काठावर हा फार्महाऊस आहे. संध्याकाळी ६:३० च्या सुमारास ही घटना घडली. अजित पवार यांच्या फार्महाऊसला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान…
Read More...

“आर आर आबांनी अलमट्टी धरण फोडण्याचा इशारा दिला होता”

आर आर आबांनी अलमट्टी धरण फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कर्नाटक सरकार ताळ्यावर आले होते आणि त्यांनी धरणातून पाणी सोडले होते अशी आठवण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितली. ते म्हणाले आबा काही खरोखर तेथे जाऊन धरण फोडणार नव्हते पण जनतेच्या हितासाठी कधी कधी राज्यकर्त्यांना धाक दाखवायला लागतो, आबांचा तो इशारा त्या व्युहरचनेचाच एक भाग…
Read More...

- Advertisement -

‘आरे काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसं मेल्यावर?’; अजित पवार भडकले

सरकारने सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचं योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच कोल्हापुरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास उशीर का केला? असा सवालही अजित पवारांनी विचारला आहे.…
Read More...

‘गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी…’; अजित पवारांचा भाजप सरकारला टोला

शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नाशिकच्या बागलाण येथील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. नंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि विधिमंडळ नेते अजितदादा पवार यांनी राज्य सरकारवर चौफेर टीकास्र सोडलं. ४५ वर्षात जितकी बेरोजगारी झाली नाही तितकी भाजप…
Read More...