InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

राष्ट्रवादी काँग्रेस

ईव्हीएम हॅकींग टाळण्यासाठी जॅमर बसविण्याची परवानगी द्या: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर ईव्हीएम यंत्रांत फेरफार केली जाण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यकत करण्यात आली आहे. ईव्हीएममशीन हॅक करणारी यंत्रणा किंवा व्यक्ती हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात फेरफार करण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही यंत्रणाकोणीही हॅक करु नये, यासाठी मतमोजणी पुर्ण होईपर्यंत गोदामाच्या ठिकाणी २१ ते २४…
Read More...

बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येवर सरकारचे एकच उत्तर ‘३७०’- शरद पवार

कोणते ना कोणते कारण दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. कुणाच्या पाठीमागे इडीची चौकशी, कुणा विरुद्ध खटले दाखल करणे अशा प्रकारचे काम करून त्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र अशा पद्धतीचे राजकारण यशस्वी होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More...

‘एक कानाखाली द्यावी’; उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसवर संतापले

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका लागला आहे. साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली होती. जाहीर सभेत भाषण करताना…
Read More...

“काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्यास शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील”

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील,’ असं वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होऊ’, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी…
Read More...

- Advertisement -

‘काँग्रेस-राष्ट्रवादी राजकारणातील थकलेले घोडे’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. त्यातच माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून बऱ्याच चर्चा रंगू लागलेल्या…
Read More...

‘अजित पवारांची मनस्थिती तपासण्याची गरज’; राष्ट्रवादीच्या उमेदवारचा अजित पवारांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुद्द मला बोलावून उमेदवारी दिली आहे. जर अपक्ष उमेदवाराला पाठींबा द्यायचाच होता, तर मग मला उमेदवारी का म्हणून दिली?, असा प्रश्न उपस्थित करत, अजित पवार यांची मनस्थिती तपासण्याची गरज असल्याचा टोला करमाळा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी लगावला आहे.…
Read More...

शरद पवारांची हवेलीत उद्या जाहीर सभा

शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अॅड.अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची उद्या (दि.११) सकाळी १० वाजता उरळी कांचन (ता. हवेली) येथील बाजार मैदानावर जाहीर सभा होणार आहे.यावेळी शरद पवार विविध मुद्द्यांवर उपस्थितांना…
Read More...

‘सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार’; पवारांनी केली फटकेबाजी

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या नेत्यांची चांगलीच फिरकी घेताना दिसत आहेत. आज वाडेगाव येथे आयोजित सभेत देखील त्यांनी "अभी तो मै जवान हू" असं म्हणत 'सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार' असं म्हणत चौफेर फटकेबाजी केली आहे.विधानसभा…
Read More...

- Advertisement -

राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण; सुशीलकुमार शिंदेचं भाकीत खरं ठरणार?

दोन दशकांनंतर पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदेंनी दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाचं केलेलं भाकीत .लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात काँग्रेस गलितगात्र झाली आहे. नेत्यांच्या गळतीमुळं तर  राज्यात दोन्ही काँग्रेसला आस्तित्वाची लढाई लढावी लागते आहे. सध्या…
Read More...

भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र? सुशीलकुमार शिंदेंना पवारांकडून थेट प्रत्यूत्तर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी थकल्याच्या सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याशी राष्ट्रवादीचा संबंध नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. आपण सगळीकडे फिरतो, आपल्या पक्षाची स्थिती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे शिंदेंच्या विधानाला अर्थ नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यानं पक्षांतर न केल्याचं सांगत पवारांनी कौतुक…
Read More...