NCP | शरद पवारांची ती एक भेट अन् लोकसभा पोटनिवडणूक रद्द; ‘या’ खासदारावरील बडतर्फीची कारवाई मागे!

NCP | नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. केरळ सत्र न्यायालयाने 2009 च्या एका खुनी हल्ल्याच्या प्रकरणात मोहम्मद फैजल यांना दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने 2013 च्या कायद्याचा आधारे मोहम्मद फैजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती. मोहम्मद फैजल यांच्यावर केलेल्या कारवाई … Read more

Shivsena | “संजय शिरसाट राजकारणातला नाचा”; युवासेनेची जहरी टीका

Shivsena | सोलापूर : शिवसेनेत फूट पडून सेनेचे ठाकरे आणि शिंदे गट तयार झाल्यापासून राज्यातील शिवसेनेचे नेते ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक नेत्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले. अतिशय खालच्या पातळीत संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय … Read more

Eknath Shinde | शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी आयोगासमोर लेखी उत्तर सादर; केला ‘हा’ दावा 

Eknath Shinde | नवी दिल्ली : शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला … Read more

NCP | “मुख्यमंत्र्यांची खासदारांसोबतची बैठक म्हणजे वरातीमागून घोडे”; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची जहरी टीका 

NCP | मुंबई : केंद्र सरकारकडून उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक बोलवली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. “केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. फक्त एक दिवस बाकी असताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदार केंद्रीय … Read more

Anil Desai | “आमदार, खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही”; युक्तीवाद सादर केल्यानंतर देसाईंची प्रतिक्रिया

Anil Desai | मुंबई : शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह आमचंच आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश देण्यात आले … Read more

Satyajeet Tambe | “अपक्ष उमेदवारी अर्ज का भरावा लागला?”; सत्यजीत तांबे म्हणाले…

Satyajeet Tambe | नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज(सोमवार) मतदान सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर व कोकण या शिक्षक मतदारसंघांचा आणि नाशिक व अमरावती या पदवीधर समावेश आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेवरील अपक्ष उमदेवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर … Read more

Sanjay Shirsat | “संजय राऊत हा राजकारणातला जोकर”; संजय शिरसाटांची एकेरी भाषेत टीका

Sanjay Shirsat | मुंबई : रविवारी 29 जानेवारी रोजी मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आला त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावरून तर्क-वितर्कांना लावले जात आहेत. त्यातच सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड भूमिका मांडत मोर्चे करणाऱ्यांवर आणि राज्य तसेच केंद्र सरकारवर सडकून … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “घरोबा एकाबरोबर अन् संसार…”; विखे-पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक निर्णय म्हणून काल रात्री पाठिंबा दिला खरा पण आता तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली आहे. ‘तांबे यांचा विजय निश्चित असून त्यांनी आता भाजपमध्ये यावे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत,’ असे विखे पाटील … Read more

Satyajeet Tambe | “मी तर अपक्ष उमेदवार अन्…”; सत्यजीत तांबेंचं मतदानानंतर स्पष्ट वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापुर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “लवकरच जे … Read more

Satyajeet Tambe | “विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त…”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला … Read more

Priyanka Chaturvedi | “या आमदार, खासदारांनी राज्यातील मतदारांशी विश्वासघात केला”; ठाकरे गटाच्या खासदाराचा शिंदे गटावर आरोप

Priyanka Chaturvedi | मुंबई : शिवसेनेमधील एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सेनेतून बाहेर पडून 40 आमदारांच्या सोबतीने स्वतंत्र गट निर्माण केला. त्यानंतर ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष टोकाला पोहचून केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदोपत्री आणि लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी आज … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “सुधीर तांबेंमधील काँग्रेसचे रक्त…”; विखे पाटलांचा मिश्किल टोला

Radhakrishna Vikhe Patil | नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला तरी कार्यकर्ते मात्र, सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार प्रचार करताना दिसले. त्यामुळे आगामी काळात लवकरच सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा मिळेल असे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Amol Mitkari | “हा कसला ‘टी राजा’ हा तर ‘कपटी’ राजा”; अमोल मिटकरींची भाजप आमदारावर बोचरी टीका

Amol Mitkari | नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ते धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांकडून आणि हिंदू संघटनांकडून आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आज हिंदू समाजाच्या मोर्चाप्रसंगी भाजपचे … Read more

Girish mahajan | “मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला”; राऊतांच्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : हिंदू समाजाच्या वतीने रविवारी मुंबईत ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात कायदे करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. … Read more

Supriya Sule | “तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या”; वाढत्या गुन्हेगारीवरुन सुप्रिया सुळे गृहमंत्री फडणवीसांवर आक्रमक

Supriya Sule | पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. शहरात कोयता गँगने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना लक्ष्य … Read more