InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

शेतकरी

शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार

पीककर्जात शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार असल्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर आता बुधवार (ता. 17) च्या मोर्चाचे जंगी आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा मोर्चा शिवसेनेचे मुंबईत प्रचंड मोठे शक्‍तिप्रदर्शन व्हावे, यासाठी शिवसेना सरसावली असून, राज्यातील सर्व खासदार, आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.मुंबईत अनेक वर्षांनंतर शिवसेनेचा मोर्चा होत आहे. त्यातच शिवसेना…
Read More...

बीडमध्ये शेतकऱ्यावर दुष्कळाचे सावट

पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी बीडमध्ये पावसाचे आगमन झाले नाही. यामुळे मोठया आशेने शेतकऱ्याने लावलेल्या कपाशी माना टाकू लागल्या आहेत. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही , चारा छावण्या बंद , पाऊस नसल्याने नवा चारा नाही अशा परिस्थितीत पशुधन कसे जगवावे , याही वर्षात शेतीत काही पिकले नाही तर काय खावे ? कसे जगावे ? या चिंतेत शेतकरी आहेत.पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वरच मदार आहे, कामासाठी स्थलांतर केलेले मजूर शेतीच्या कामासाठी गावाकडे परतले आहेत. मात्र…
Read More...

मंगरुळपीर तालुक्यातील १७ हजार शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाच्या प्रतिक्षेत

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनअंतर्गत तालुक्यातील जवळपास २५ हजार शेतकरी पात्र असतांना केवळ साडेसात हजार कास्तकारांनाच प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत जवळपास १७ हजार कास्तकार योजनेच्या लाभाच्या प्रतिक्षेत असुन सर्व कास्तकारांना तातडीने लाभ मिळावा अशी मागणी पं.स. सदस्या  रफीका बानो युनूस खान व सामाजिक कार्यकर्ते युनूस खान यांनी केंद्रीय कृषि मंत्र्यांना निवदेनाद्वारे केली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील २ हेक्टर किंवा त्यापेक्षाकमी जमीन असलेले १४२०० शेतकरी तर २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेले…
Read More...

‘श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकता, मग शेतकऱ्यांचे का नाही?’

भाजप लाखो कोटींचे श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकते मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करू शकत नाही? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारला आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या कृषीविषयक धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.'सरकारने गेल्या पाच वर्षांत श्रीमंतांचे ५.५ लाख कोटींचे कर्ज माफ केलं आहे. पण त्याचवेळी शेतकऱ्यांचे कर्ज मात्र सरकार माफ करत नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची सरकारने पूर्तता करायला हवी' असं राहुल गांधींनी सांगितलं. याआधीही भाजप सरकार शेतकरीविरोधी…
Read More...

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून बँकांनी त्रास देऊ नये, यावरदेखील सरकारने लक्ष द्यावे, असेही राहुल यावेळी म्हणाले. यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी…
Read More...

आत्महत्येची परवानगी द्या’; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रुड येथील शेतकऱ्यांना 2018 चा सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनेक चकरा मारल्या. मात्र बँकचे अधिकारीही शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे देत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना निवेदन देऊन 'पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता ?' असा प्रश्न विचारला आहे. अनेक महिन्यांपासून शेतकर्‍यांची हेळसांड होत असल्याने शेतकऱ्यांना आता चक्क आत्महत्या…
Read More...

राजू शेट्टींचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन

निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या दुखा:ला मी कवटाळत बसलो असतो, तर शेतकरी हतबल झाला असता. ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापायचा नसतो, तर ती जखम बरी करून पुन्हा जोमाने कामाला लागायचे असते, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. देशातील शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने बघत हतबल झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कार्यकर्त्यांनी पराभव विसरून जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले. जिल्ह्यातील आंबा येथे झालेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ता अभ्यास…
Read More...

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेले शेतकरी ऐन पावसाळ्यातही आत्महत्या करत आहेत. गेल्या १४ दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र मराठवाड्यात थांबण्यास तयार नाही. १६ ते ३० जून या कालावधीत मराठवाड्यातील ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक नऊ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून त्या खालोखाल औरंगाबाद सात, नांदेड सहा आणि जालना जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. परभणी, लातूर व…
Read More...

अर्थसंकल्पाच्या पूर्वीच मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट

अर्थसंकल्पाच्या पूर्वीच मोदी सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळानं किमान आधार मूल्य (MSP) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. धान्याची प्रति क्विंटल MSP 85 रुपयांनी वाढवली आहे. आता मका, बाजरी, शेंगदाणा, तुरीच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे.गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी सरकारनं 10 वर्षांतली किमान आधार मूल्यात सर्वात मोठी वाढ केली होती. सोयाबिनच्या किमतीतही 311 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. तर सूरजमुखीच्या किमतीत 262 रुपये क्विंटलची वाढ केली गेली आहे. तूरडाळीच्या…
Read More...

लातुरात पेरणीला सुरुवात

लातूर - राज्यात मन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. लातूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर, अहमदपूर या भागात शेतकरी पेरण्या करू लागल्या आहेत. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त ०२ टक्के पेरण्या अद्याप झाल्या आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली असून लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात यावर्षीही दुष्काळाच…
Read More...