InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

काँग्रेस

जागावाटपाबाबत अजुन निर्णय झाला नाही – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. जागावाटपाबाबत या बैठकीत फॉर्म्युला ठरणार होता मात्र त्याबाबत अजुन निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. घटक पक्षांनी जागांची मागणी केल्याने त्यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसेबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांनी आपल्या दिल्ली भेटीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती.…
Read More...

विधानसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत सामील?

मोदीविरोधाच्या बहाण्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रवेश मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या काँग्रेसने मनसेला महाआघाडीमध्ये सामील करण्यास विरोध केला होता, तोच काँग्रेस आता विधानसभेच्या तोंडावर मोदीविरोधकांची एकजूट बांधण्यासाठी मनसेला सोबत घेण्यास उत्सुक दिसत आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर मनसे काँग्रेसला साथ देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेस नेत्यांसोबत याविषयी सकारात्मक चर्चा करत आहेत.…
Read More...

राजीनाम्यानंतरही काँग्रेसमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतं आहेत राहुल गांधी?

काँग्रेसने नुकतीच महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली. तसेच 5 कार्यकारी अध्यक्षदेखील नेमले आहेत. महाराष्ट्राअगोदर छत्तीसगडमध्येदेखील नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. परंतु काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी 50 दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मग पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोण घेत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे कामकाज कसे सुरु आहे? पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोण घेत आहे? पक्षावर…
Read More...

‘धड आहे आणि डोकं नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे’

ज्यातील काँग्रेसची स्थिती पाहूनच आम्ही त्यांना ४० जागांचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे, पुढे काय करायचे ते कॉंग्रेसने ठरवाव. सध्या केंद्रात आणि राज्यातही त्यांच्याकडे निर्णय घेणारेच कोणी नाही. त्यामुळे धड आहे आणि डोकं नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली.आंबेडकर म्हणाले की, गेल्या तीन निवडणुकांपासून राज्यातील निम्म्या मतदारसंघात काँग्रेस लढलीच नाहीये. त्यामुळे तिथे त्यांचे संघटनच नाही. आमच्या प्रस्तावाचे काय…
Read More...

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी ‘का’ होतोय विलंब?

काँग्रेस वर्किंग कमिटी ही पक्षामध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर कुठल्याही हंगामी अध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे वर्किंग कमिटीची बैठक कोण बोलावणार?हा एक वेगळाच प्रश्न आहे.संघटन महासचिव म्हणून के. सी. वेणुगोपाल यांनी वर्किंग कमिटीची बैठक बोलवायला हवी, परंतु वेणुगोपाल वर्किंग कमिटीत फारच ज्युनियर आहेत. वर्किंग कमिटीत सर्वात ज्येष्ठ सरचिटणीसांकडे हा अधिकार आहे, असे काहींचे म्हणणे आहे. परंतु त्यातही दोन प्रश्न आहेत. सलगचा काळ मोजला तर सर्वात…
Read More...

‘भारतात इंग्रजांचं राज्य आलं नसतं तर मराठ्यांचं साम्राज्य असतं.’

काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर हे त्यांच्या विविध विषयांवरील व्याख्याने आणि लेखनामुळे अनेकदा चर्चेत असतात. आताही शशी थरूर यांचा एक व्हिडिओ महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होत आहे. कारण यामध्ये थरूर यांनी मराठा साम्राज्याविषयी भाष्य केलं आहे.'भारतात इंग्रजांचं राज्य नसतं तर आता भारताची स्थिती काय असती,' असा प्रश्न एका कार्यक्रमादरम्यान शशी थरूर यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शशी थरूर म्हणाले की, 'मराठ्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात साम्राज्यविस्तार केला होता. अगदी तंजावरपर्यंत…
Read More...

बाळासाहेब थोरात-सुजय विखे एकाच विमानात

एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून नगर जिल्ह्यात परिचीत असलेले काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आज एकत्र पाहायला मिळाले. आमदार बाळासाहेब थोरात आणि खासदार सुजय विखे यांनी एकाच विमानातून प्रवास केला.एकमेकांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी असलेले बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे यांना सोमवारी योगायोगाने दिल्लीला एकाच विमानाने जावं लागलं. दोघेही शिर्डीवरुन दिल्लीला रवाना झाले. सकाळी 10.30 वाजता स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी…
Read More...

काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही – सुधीर मुनगंटीवार

काँग्रेसचं इंजिन खराब झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनाचा तसंच लोकार्पणाचा सोहळा काल रविवारी पार पडला. सेलूमधील नवीन बसस्थानकाचं भूमिपूजन तर वर्ध्यात नवीन बसस्थानकाचं लोकार्पण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं.काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची…
Read More...

उद्याच्या बैठकीत काँग्रेसचा उत्तराधिकारी निवडला जाण्याची शक्यता

राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षापदावरून राजीनामा दिल्यानंतर उद्याच्या बैठकीत त्यांचा उत्तराधिकारी निवडला जाण्याची शक्यता आहे. या पदावर मुकुल वासनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक असून त्यामध्ये कोण काँग्रेस अध्यक्ष करायचा यावर निर्णय होवू शकतो.लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेसला सर्वात गंभीर नेतृत्व संकटाचा सामना करावा लागला आहे. नेतृत्व संकटाच्या दरम्यान…
Read More...