Ravindra Dhangekar | ‘This Is Dhangekar’; चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात धंगेकरांचे बॅनर

Ravindra Dhangekar | कोल्हापूर : पुण्यातील कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धुळ चारली. या पराभवावरुन भाजपवर टीका होत असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही टीका होत आहे. Chandrakant Patil criticize Ravindra Dhangekar … Read more

Sanjay Raut | “2024च्या विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील”; राऊतांचा विश्वास

Sanjay Raut | पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. पण चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीने वंचित आघाडीचा पाठिंबा घेतला नाही. त्यानंतर वंचितने कलाटे यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचारही केला होता. त्यामुळे राहुल कलाटे यांनी प्रचंड मते घेतली आणि महाविकास … Read more

Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी … Read more

Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे ( Satyajeet Tambe ) यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास … Read more

MLC Election Result | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी … Read more

Chandrashekhar Bawankule | “नागपूरात आमचा उमदेवार असता तर आम्ही जिंकलो असतो”; बावनकुळेंचं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule | मुंबई : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दर्शवलेल्या ना. गो. गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे.  नागपूर भाजपचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या … Read more

Shubhangi Patil | काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याच्या आरोपावर शुभांगी पाटलांचं स्पष्ट वक्तव्य

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पण महाविकास आघाडीच्या उमेदवार … Read more

Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही. या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) … Read more

Nana Patole | “फडणवीसांना सत्तेत आल्यावर वीजबिल माफीचा विसर”; नाना पटोलेंची खोचक टोला

Nana Patole | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत नसताना वीज बील माफ करण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. त्याचाच दाखला देत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. नाना पटोले हे आज नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी फडणवीसांना टीकेचे लक्ष्य केले आहे. “देवेंद्र फडणवीस विरोधी … Read more

Prakash Ambedkar | “आमची युती ठाकरेंशी, महाविकास आघाडीशी…”; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

Prakash Ambedkar | पुणे : दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता. यावर आता … Read more

Gunratna Sadavarte | “शरद पवारांनीच फडणवीसांच्या अटकेचा कट रचला”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप

Gunratna Sadavarte | मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपानंतर अनेक राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. पण आता वकील गुणरत्न सदावर्ते यासंदर्भात शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे. “देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट हा शरद पवार यांनीच … Read more

Jayant Patil |“माझ्यापुढं कोणी असा…”; फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी एका कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. ‘महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिलं होतं’, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर विरोधकांनी प्रत्यारोप करायला सुरवात केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

Dilip Walse Patil | देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ आरोप तत्कालीन गृहमंत्र्यांनी फेटाळला; म्हणाले…

Dilip Walse Patil | मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. तसं त्यावेळी सीपींना टार्गेटच दिलं गेलं होतं, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोपावर तत्कालीन … Read more

Devendra Fadnavis | “त्यावेळी मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच सीपींना दिलेलं”; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

Devendra Fadnavis | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीच मला ‘मातोश्री’चे दरवाजे बंद केले. मात्र वहिनी मला … Read more