InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मनसे

चोरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मनसे महिला कार्यकर्त्यांकडून चोप

पश्चिम रेल्वेवर असणाऱ्या मुंबई सेंट्रल स्थानकात चोरी केल्याप्रकरणी तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मनसे महिला कार्यकर्त्यांकडून अद्दल घडविण्यात आली आहे.मनसेच्या युवा कार्यकर्त्या नंदिनी बेलेकर या मुंबई सेंट्रल स्थानकातून तिकीट घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत खारला जात होत्या. त्यावेळी नंदिनी यांच्या मैत्रिणीचा मोबाईल तिकीट काऊंटरवरच चुकून राहून गेला. मोबाईल नसल्याचं लक्षात येताच अर्ध्या वाटेतून परत येऊन नंदिनी आणि तिच्या मैत्रिणीने तिकीट काढणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मोबाईलबाबत विचारणा केली.…
Read More...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात सुविधांपासून रूग्ण वंचित

रुग्णलायातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पिपंरी चिंचवड येथील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयामध्ये लहान मुलांना इंजेक्शन देताना चक्क जमिनीवर झोपून दिलं जात आहे.पिंपरी चिंचवडच्या देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयामध्ये लहान मुलांना लसीकरण दिले जात आहे मात्र ते बेड वर न देता या चिमुरड्यांना चक्क जमिनीवर फक्त एक चादर टाकून इंजेक्शन्स दिले जात आहे. हा संपूर्ण प्रकार विडिओ कॅमेरा मध्ये कैद झाल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि…
Read More...

पवार साहेबांनी महायुतीत यावे- रामदास आठवले

'शरद पवार साहेबांचा ईव्हीएम मशीनवर संशय आहे. पण आमचा पवार साहेबांवर संशय नाही. त्यांनी महायुतीत यावे,' असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पवारांना टोला लगावला आहे. वसईत इथं रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आाला, तेव्हा ते बोलत होते.राज ठाकरे यांची मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीवर रामदास आठवले यांनी टीका केली आहे. मनसे आणि वंचित हे दोघेही स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, असं आठवले यांनी मह्टलं आहे.दरम्यान, कोल्हापूरमध्येही रामदास आठवले यांनी वंचित…
Read More...

खासदार कोल्हेंनी घेतली ठाकरेंची भेट

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं बोललं जात आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचं अमोल कोल्हे यांच्याकडून…
Read More...

राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर

संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत आहे, तर राष्ट्रवादीचे 5 उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र सुरूवातीच्या मतमोजणीत पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आघाडीच्या उमेदवारांची जोरदार पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.राज ठाकरे यांच्या सभांचा आघाडीला फायदा होईल असे बोलले जात होते मात्र सुरूवातीच्या कलांवरून आघाडीला मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे.राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड आणि सातारावगळता इतर सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत,…
Read More...

राज ठाकरेंसोबतचे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत – छगन भुजबळ

यापूर्वी राज ठाकरेंनी माझ्या घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राजकारणात असे होतंच राहते. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.राज ठाकरे आणि भुजबळ यांच्यात काही वर्षांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगले होते. मात्र आता छगन भुजबळ यांनी हे वैर संपले असल्याचे म्हटले आहे.तसेच, राज ठाकरेंच्या सभांविषयी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभांचा राष्ट्रवादी आणि…
Read More...

ज्योतिष संमेलनातील वर्तवण्यात आले भाकीत, विधानसभेत मनसे जिंकणार दोन आकडी जागा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष मनसे, दोन आकडी जागा जिंकेल, असे भाकित नाशिकच्या ज्योतिष संमेलनात वर्तवण्यात आले आहे. नाशिकमध्ये सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर शात्री यांनी हे भाकित केले आहे.तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीकरून निवडणूक लढवणार असेही, त्यांनी सांगितले.राज यांच्या पत्रिकेतील गुरु पुन्हा धनु राशीत येत असल्याने याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत…
Read More...

काहीही झाले तरी राज ठाकरेंना आघाडीत घेणार नाही – संजय निरूपम

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना आघाडीत घेणार का याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आता यावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काहीही झाले तरी मनसेला आघाडीत घेणार नाही, असे निरूपम यांनी स्पष्ट केले आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.“राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही. मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका…
Read More...

‘जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ?’, राज ठाकरेंच्या या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दुष्काळ प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.  29 हजार गावात दुष्काळ जाहीर झाला, मग सिंचनाबाबत काय कामं केली असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. आता यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांना विचारावा” असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अनिल परब यांनी दिले आहे.अनिस परब म्हणाले की, गेल्या पाच वर्षात…
Read More...

…तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज लागणार नाही – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकार आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राज्यातील मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारने फसवलं आहे. असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.राज्यातल्या मुला मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही, असे देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते आहेत कुठे आहेत असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.दुष्काळावरून देखील राज ठाकरे यांनी सरकारवर…
Read More...